Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगरात चोरट्यांची नजर आता क्रेटा कारवर असून दि २५ रोजी रात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन क्रेटा कार चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरंग शेळके हे ए एस क्लब तापडिया इस्टेट येथे कुटुंबासह राहतात. त्यांचे बजाजनगर येथील मोरे चौक येथे पेंट चे दुकान आहे. शेळके यांना रात्री घरासमोर लागलेली कार एम एच २०एफ जी ६९८८ सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरासमोर दिसली नसल्याने त्यांनी आजूबाजूला व परिसरात शोध घेतला असता त्यांना कार मिळून आली नाही. त्यामुळे त्यांना कार चोरी झाल्याचे लक्षात आले.

तसेच दुसऱ्या घटनेत संगीता अरुण कोमटे, या श्री स्वामी समर्थ नगर सिडको वाळूज महानगर १ येथे राहतात, त्यांच्याकडे क्रेटा एम एच २० इ वाय ८७३३ ही कार आहे, सकाळी त्यांनाही घरासमोर लावलेली कार दिसली नाही, इतरत्र शोध घेतला असता कुठेही कार दिसत नसल्याने त्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कैमरात बघितले असता चोरट्यांनी कार चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दोन्हीही घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे. परंतु या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
*****^
-
तलवार–सुरा घेऊन दहशत माजवणारा परवेज पोलिसांच्या जाळ्यात
Share Total Views: 38 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज महानगर जोगेश्वरी परिसरात हातात तलवार आणि सुरा घेऊन
-
लाडक्या बहिणींना दिलासा! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ
Share Total Views: 40 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) छत्रपती
-
“पीएमओ सचिव” बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत!
Share Total Views: 15 वाळूज MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई – साथीदारासह बेड्या न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज



