July 8, 2025
88f86f46-5d8f-47b6-be50-93110021fe0c

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर :  पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा आणि काचेचा वापर करून निर्मिलेल्या मांजाचा वापर रोखण्यासाठी व पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरीक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दि २४ रोजी ठीक ठिकाणी पाहणी करून प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ही कामगिरी मा. प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा.पोलीस उप आयुक्त  नितीन बगाटे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख,  कृष्णा शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना खाली पोउपनि/ प्रविण पाथरकर, पोउपनि/भाग्यश्री शिंदे, पोउपनि/ काळे, पोह/ बाळासाहेब आंधळे, जयश्री म्हस्के, पोअं.राजाभाऊ कोल्हे, हनुमान ठोके,  राहूल खरात, बबलू थोरात, यांनी केलेली आहे.

******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!