Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील गट नंबर ४३ येथील सी बर्ड लॉजी सॉल्यूशन या कंपनीत चोरट्यांनी दि २२ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास कंपनीचे शरद उचकटून १४ लाख ६७ हजार ६८८ रु किमतीचे पार्ट्स चोरी केले आहे. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापक संदीप केदारे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात गट नंबर ४३ येथील सी बर्ड लॉजी सॉल्यूशन ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये बजाज कंपनीचे असलेले दुचाकी, तीनचाकी वाहनाचे काही पार्ट्स तयार होतात. दि २२ डिसेंबर रोजी नियमित पणे रविवार असल्याने सायंकाळी ५ वाजता कंपनीचा सर्व स्टाफ कंपनी बंद करून घरी गेला. दि २३ रोजी सकाळी ६:३० वाजता कंपनीचे कामगार नितीन शिरसाठ यांनी कंपनी उघडली असता दुचाकी, तीनचाकीचे स्पेअर पार्ट चोरी झाल्याचे त्यांचा लक्षात आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैमरा कैद झाला असून प्रत्येकी ४९६ किमतीचे असलेले २९५३ स्पेअर पार्ट्स एकूण किंमत १४ लाख ६७ हजार ६८८ रु किमतीचा पार्ट्स चोरी झाल्याची गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैष्णव हे करीत आहे.
*****
-
तलवार–सुरा घेऊन दहशत माजवणारा परवेज पोलिसांच्या जाळ्यात
Share Total Views: 38 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज महानगर जोगेश्वरी परिसरात हातात तलवार आणि सुरा घेऊन
-
लाडक्या बहिणींना दिलासा! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ
Share Total Views: 40 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) छत्रपती
-
“पीएमओ सचिव” बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत!
Share Total Views: 15 वाळूज MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई – साथीदारासह बेड्या न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज



