
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर
वाळूज सिडको महानगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नायब सुबेधार सागर सुतार, एलेकर विलास, संस्थेचे अध्यक्ष श्रीनीवास नंदमुरी, लता नंदमुरी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रिन्सिपल शेख अंजुम बानो यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. नायब सुबेधार सागर सुतार, एलेकर विलास, संस्थेचे अध्यक्ष श्रीनीवास नंदमुरी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नायब सुबेधार सागर सुतार मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आठवणी तर सांगितल्याच त्याचबरोबर मैदानवर विविध खेळ खेळा, निरोगी राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे व खेळाचे सादरीकरण केले. शाळेतील राज्य, जिल्हा, विभाग पातळीवर खेळाणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी प्रिन्सिपल शेख अंजुम बानो, प्रिन्सिपल रेणुका काकडे, सविता बोबडे, क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
- धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!