November 21, 2024
6c9b4be0-39a7-4921-817e-cc57ab1bca76

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर ) : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक सुरुळीत सुरू असतांना काही ठिकाणी गालबोट कागलेले आहे, छत्रपती संभाजीनगर मधील पश्चिम मतदार संघातील महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाचे पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह ५० कार्यकर्त्यांवर शासकिय कामात अडथळा, पोलिसांसोबत उद्धट वर्तन, कारल्याप्रकरणी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन अशा विविध कलमांखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजाजनगर येथे दि २० रोजी सायंकाळी अल्फोनसा इंग्लिश शाळा बजाजनगर येथील मतदान केंद्राच्या बाहेर १०० मिटरच्या आत मध्ये मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रीत जमलेला आहे. जमावाकडून मतदान प्रक्रियेस बाधा येवू शकते व बुथमधील मतदानाच्या साहित्याचे नुकसान होवू शकते. त्यामुळे मतदान प्रक्रिये मध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. परंतु पोलिसांचा ताफा बघून नागरिकांमध्ये धावपळ झाली काहिजण जखमी झाले. दरम्यान तिथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे, व त्यांच्या सोबतचे 40 ते 50 पुरूष व महिला कार्यकर्ते नितीन बगाटे पोलीस उप आयुक्त, यांनी जमावबंदीचे आदेश आहेत. तुम्ही रस्ता आडवू नका येथून निघून जा असे सांगीतले असता जमावातील उमेदवार राजू शिंदे व त्यांचे कार्यकर्ते यांनी पोलीस उप आयुक्त, सुचनाकडे दुर्लक्ष केले व त्यांना तेथून जाण्यास सांगीतल्यामुळे पोलिस व राजू शिंदे यांच्यात बाचाबाची झाली.
थोड्या गदरोळा नंतर पोलिसांनी जाणवाला पांगवले या प्रकरणी विविध ९ कलमानंतर्गत वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

*****



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!