November 21, 2024
c7eb2dd1-b70b-4eda-b5fc-0cec53c66e50

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : मुळगावी मतदान करण्यासाठी गेलेल्या तिघांचे घर फोडून चोरट्यांनी लाखोंच्या सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. ही घटना सिडको वाळूज महानगर १ मधील राजस्वप्न पूर्ती सोसायटी मध्ये आज दि २१ रोजी सकाळी उघडकीस अली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल चांगदेव मालवदे हे राज स्वप्नपूर्ती गट नंबर ९४ रो हाऊस नंबर ए २-१३ मध्ये कुटुंबासह राहतात. ते दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मूळ गाव दर्यापूर ता राहता जि अहिल्यानगर येथे मतदान करण्यासाठी गेले होते. आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ते परत राज स्वप्नपूर्ती येथे घरी आले असता त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यांना संशय आल्याने घरात जाऊन बघितले असता कपाटामध्ये ठेवलेले ५५ हजार रु. सोन्याचे दागिने ज्यात एक तोळ्याचे मिनी गंठण, ८ ग्राम वजनाचे मिनी मंगळसूत्र, ५ ग्राम सोन्याची ठुशी असा एकूण १ लाख ४७ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कळले. ही घटना सोसायटीमध्ये राहणारे शंतनू चौधरी यांना सांगितली असता त्यांनी चौधरी यांनी सागर देवसिंग जोनवाल यांच्याही घरी चोरी झाल्याचे सांगितले. सागर जोनवाल हे दि २० रोजी दुपारी मुळगाव बदनापूर येथे गेले असता त्यांना शेजारी राहणरे सदाशिव लांडगे यांनी चोरी झाल्याचे कळवले. जोनवाल यांनी तत्काळ घरी येऊन घरामध्ये साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले दिसले असता घरामधील दागिने बघितले असता सोन्याचे १२ ग्राम वजनाच्या दोन अंगठ्या, ६ ग्राम वजनाचे गंठण असा एकूण ८५ हजाराचे दागिने त्यांना चिरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच सोसायटीमध्ये राहणारे योगेश्वर जाधव हेही घनसावंगी येथे ड्यूटी कामी गेले व त्यांची पत्नी मुळगाव तुर्काबाद खराडी येथे मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांच्याही घरी चोरी झाल्याचे कालिदास भगरे यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ घरी पोहचून घरात ठेवलेले ६ ग्राम वजनाची सोन्याची आंगठी १० ग्राम वजनाचे मणी मंगळसूत्र, ३ ग्राम कानातील वेल, असा एकूण ९५ हजार रु किमतीचे दागिने जाधव यांचेही चोरट्यांनी लंपास केले. तिघांचा मिळून एकूण ३ लाख २७ हजार रु किमतीचे दागिने चिरट्यांनी लंपास केले. घटना सोसायटीच्या कॅमेरात कैद झाली असून रात्री अडीच वाजेच्या दरम्यान ५ चोरटे त्यांचाकडे बॅग व तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत कॅमेरात दिसत आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Screenshot

पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी – कुठारे

चोरी ची घटना घडली त्या ठिकाणी तातडीने जाऊन पोलीस प्रशासन यांना माहिती देऊन यावर ताबडतोब कार्यवाही ची मागणी पोलीस निरीक्षक श्री कृष्णा शिंदे साहेब यांच्या कडे केली असता तातडिने डाॅग स्काॅड, फिंगर प्रिंट ची टिम तसेच पोलिओ आधिकारी पाठवून चौकशी सुरूवात केली तसेच सिडको वाळूजमहानगर परिसर मोठा असल्यामुळे या परिसरात जास्तीची गस्त वाढविण्यात यावे आशी मागणी मा.उपसरपंच नागेश कुठारे यांनी केली

*******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!