न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/ अनिकेत घोडके
वाळूज महानगर
विधानसभा सार्वत्रिक अनुषंगाने निवडणुकीच्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना केंद्रवार मोबाईल नेता येणार नाही किंवा मोबाईल नेलाच तर बाहेर ठेवावा लागणार आहे. मोबाईल ठेवून मतदान केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम मतदार संघात ६६ व गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघात ६७ दोन्ही मतदारसंघ मिळून एकून १३३ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे अवाहन वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा शिंदे यांनी केले आहे.