
छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या गाडीवर तीन दुचाकींवर आलेल्या सहा अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. ही घटना रात्री सव्वा दहा वाजता गोलवडी भागातून शहराकडे जात असताना घडली.
सिद्धांत शिरसाट हे त्यांच्या मित्र आणि वाहन चालकासोबत गाडीमध्ये प्रवास करत होते, तेव्हा अचानक तीन दुचाकींवर आलेल्या सहा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर दगडफेक केली. दगडफेकीमुळे गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, सिद्धांत यांचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे. तथापि, सिद्धांत शिरसाट आणि वाहन चालक सुरक्षित आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. हल्ल्याचे कारण आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
****
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


