

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला जोरदार फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर प्रथम छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिरसाट हे तातडीने मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामागे कारणही तसेच आहे. संजय शिरसाट यांच्या प्रचार सभेमध्ये कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरु झाली. त्यामुळे आपल्याला आता विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसायला नको, त्यामुळे संजय शिरसाट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
याविषयी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की. कालीचरण महाराजांशी माझा काही संबंध नाही. मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता. मनोज जरांगे पाटील यांचा नेहमीच मी आदर करत आलेलो आहे. माझ्या मतदारसंघातच कालीचरण महाराजांची सभा झाली असली तरी त्याच्याशी माझा संबंध नसल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे देखील ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये केवळ औपचारिक चर्चा झाली असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
*******
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न