

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर ) – रांजणगाव शेणपूंजी येथील दुपारच्या सभेसाठी सकाळपासून तयारी करून १ वाजेच्या सुमारास सभास्थळी आलेले मतदार देवा भाऊची वाट पाहून पाहून कंटाळल्याने अखेर त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर सभेच्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सभा सुरू झाली.

विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे आमदार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवा भाऊ यांच्या सभेचे आयोजन शनिवारी दिनांक ९ रोजी दुपारी २ करण्यात आले होते. या सभेसाठी गर्दी व्हावी म्हणून तालुक्यातून अनेक मतदार आणण्यात आले होते. दोन वाजेची सभा असल्याने एक वाजेपासूनच सभास्थळी कार्यकर्ते, मतदारांची गर्दी झाली होती. एक वाजेपासून आलेले मतदार देवा भाऊची सभा ऐकण्यासाठी ताटकळले. मात्र पाच वाजले तरी देवा भाऊ सभास्थळी आले नाही. त्यामुळे वाट पाहून पाहून मतदारांनी सभास्थळापासून काढता पाय घेतला. त्यामुळे सभा मंडपातील अनेक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. अखेर देवा भाऊ हेलिकॅप्टर मधून उतरले आणि सायंकाळी ५.५१ वाजता सभेला सुरुवात केली. साडे एकोणावीस मिनिटाच्या भाषणात त्यांनी विरोधकावर टीका करत युती सरकारने केलेल्या कामाचा उहापोह केला.
******
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न
Tutari