November 21, 2024
12e5f8a7-6683-4e04-8d65-74956506fca0

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील ए एस क्लब चौकामध्ये समोरून येणारी संशयीत कार पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही थांबली नसल्याने पाठलाग करून सायबर पोलीस ठाणे पोलिसांनी ओयसिस चौकामध्ये संशयीतकार चालकला थांबावून ताब्यात घेऊन झाडाझडती घेली असता त्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई दि ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. सौरभ काशिनाथ आरगडे, वय २३ वर्षे, रा. धनगरगल्ली, वाळुज, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर चालक अमोल विलास शिंदे, वय २९ वर्षे, रा. गणेश वसाहत, वाळुज, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. आरोपींकडून २,५४,४००/- रुपये किंमतीचा राजनिवास सुगंधीत पानमसाला गुटखा, ६३,६००/- रुपये किंमतीचा Z-L 01 जाफराणी जर्दा व सदर वाहतुक करण्याकरीता वापरलेली १२० कार असा एकुण १० लाख १८ हजार असा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही मा. पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. शिवचरण पांढरे, पोलीस ठाणे सायबर, पोउपनि श्री. सागर पाटील, पोउपनि श्री. संदीप शिंदे, पोह/विनोद परदेशी, सुनिल जाधव, सुधीर मोरे, रंजक सोनवणे, पोना/सतिश हंबर्डे, पोअं/राजाराम वाघ, सुनिल बेलकर, नितीन देखमुख, अजय दहिवाळ, सोहेल पठाण, प्रमोद सुरसे यांनी केली आहे.

******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!