छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एमडी मेफेड्रॉन ड्रग्स अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना सापळा रचून दि ७ नोव्हेंबर रोजी अटक केली त्यांचेकडून एकूण ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली गेट परिसरात दोन व्यक्ती हे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे सायबर पोलीस ठाणे यांचेकडून पथक तयार करण्यात आले, पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून अमन बेग सलीम बेग वय २१, शेख शेहजाद शेख शहबाज या दोघांना अटक करून त्यांचेकडून एमसी ड्रग्स, मोपेड व मोबाईल असा एकूण ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), मा. सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोउपनि संदीप शिंदे, पोउपनि. सागर पाटील, पोह विनोद परदेशी, पोह सुनिल जाधव, पोह सुधीर मोरे, मो पोह/रंजक सोनवणे, पोना सतिश हंबर्डे, पोअं राजाराम वाघ, पोअं सुनिल बेलकर, पोअं नितीन देखमुख, पोअं अजय दहिवाळ, पोअं सोहेल पठाण, पोअं प्रमोद सुरसे, मपोअं सोनाली भदाणे व न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील तज्ञ नामे डॉ. हकीकउल्लाह शाह, सहा. रासायनिक विश्लेषक, चेतनकुमार रघुनाथराव यावतकर, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक व आकाश काशीराम चिपोले यांनी यशस्वरित्या पार पाडली आहे.
*******
-
पश्चिम मतदार संघातील बजाजनगर येथे झालेल्या गदारोळा प्रकरणी राजू शिंदेसह ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Share Total Views: 25,319 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर
-
खबरदार, मतदान केंद्र परिसरात मोबाइल न्याल तर होईल गुन्हा दाखल
Share Total Views: 6 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/ अनिकेत घोडके वाळूज महानगर विधानसभा सार्वत्रिक अनुषंगाने निवडणुकीच्या
-
संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवर दगडफेक; मित्र किरकोळ जखमी
Share Total Views: 13 छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट