शासनाच्या पाणीटंचाई निवारणाच्या सूचनांदरम्यान पुढाकार; स्वच्छ पाणीपुरवठा, हातपंप दुरुस्ती आणि टँकर सुरू करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागांत पाण्याची गरज आहे, त्या ठिकाणी पाणीपुरवठा करावा आणि परिस्थितीनुसार विविध उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी स्तरावरूनही पाणी साठवण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर वाळूज महानगर परिसरातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधत पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (दत्ता) वर्पे यांनी सिडको प्रशासनाला निवेदन दिले आहे. परिसरातील बंद पडलेल्या सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलची स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सिडको परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांची वेळेत स्वच्छता आणि दुरुस्ती केल्यास त्यांचा वापर पाणीपुरवठ्यासाठी करता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दत्ता वर्पे यांनी सिडको प्रशासनाकडे परिसरातील सर्व सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलमधील गाळ काढून त्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. तसेच बंद अवस्थेत असलेल्या हातपंपांची तातडीने दुरुस्ती करावी आणि आवश्यक ठिकाणी हातपंपांवर मोटार बसवून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही केली आहे.
नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा होत नसलेल्या आणि पाणीटंचाई अधिक जाणवणाऱ्या भागांमध्ये दररोज मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. विहिरी आणि बोअरवेलमधून मिळणाऱ्या पाण्याचे आवश्यक निर्जंतुकीकरण करूनच ते नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे शासनाकडून संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जात असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर जलस्रोतांची स्वच्छता, दुरुस्ती आणि पर्यायी पाणीपुरवठ्याची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे सिडको प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन कोणत्या उपाययोजना करते, याकडे वाळूज महानगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
॰॰॰॰॰॰
- पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दत्ता वर्पे यांचे सिडको प्रशासनाला पत्र; बंद विहिरी-बोअरवेल स्वच्छ करण्याची मागणीShare Total Views: 2शासनाच्या पाणीटंचाई निवारणाच्या सूचनांदरम्यान पुढाकार; स्वच्छ पाणीपुरवठा, हातपंप दुरुस्ती आणि टँकर सुरू
- नवरात्रात भगर खाताना सावधान! बुरशीग्रस्त भगरीमुळे अन्नविषबाधेचा धोका; FDA च्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचनाShare Total Views: 47छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | (NEWS MARATHWADA) नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगर खरेदी करणाऱ्या
- छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘क्लिफ ऑल डे डायनिंग’चा अन्न परवाना निलंबित; FDA ची कडक कारवाईShare Total Views: 17NEWS MARATHWADA | SANDEEP LOKHANDE छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
- ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडShare Total Views: 70बजाज नगर, वाळूज : जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयातर्फे आयोजित विविध क्रीडा
- राजभोग हॉटेलचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत ८८ पैकी केवळ १८ गुणShare Total Views: 158News Marathwada | Sandeep Lokhande छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील महाराणा





