
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या तीन महिन्यांच्या सामूहिक वाचनाची सांगता; धम्म रॅली, त्रिशरण-पंचशील प्रदान आणि भीमगीताने कार्यक्रमाला रंगत
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सावित्रीबाई फुले नगर, प्रज्ञानगर परिसरातील आनंद बुद्ध विहारात सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी वर्षावास सांगता समारोह मोठ्या उत्साहात आणि धम्ममय वातावरणात पार पडला. पूजनीय भदंत करुणानंदजी महाथेरो यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या सामूहिक वाचनाची सांगता करण्यात आली.
वर्षावासाच्या कालावधीत ग्रंथवाचन, बुद्धवंदना आणि धम्मविचारांच्या प्रसारातून परिसरात भगवान गौतम बुद्धांच्या शांती, समता, करुणा आणि मानवतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. या उपक्रमामुळे उपासक-उपासिका, युवक आणि बालकांमध्ये बुद्धविचारांची प्रेरणा निर्माण झाली.
भिक्खू संघाच्या धम्म रॅलीने परिसर धम्ममय
वर्षावास सांगता समारोहानिमित्त पूजनीय भदंत करुणानंदजी महाथेरो यांच्या उपस्थितीत भिक्खू संघाची भव्य धम्म रॅली काढण्यात आली. वडगाव कोल्हाटी परिसरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली आनंद बुद्ध विहारात पोहोचली. तेथे वर्षावास उत्सव समितीच्या वतीने भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले. ग्रंथवाचक नामदेव केदारे, गौतम पाईकराव, सतीश साळवे, कौशल्याबाई निकम, कलाबाई साळवे आणि वंदना सावतकर यांनी स्वागत केले.
त्रिशरण-पंचशील प्रदान; बुद्धविचारांचा संदेश
कार्यक्रमात पद्मपाणी बुद्ध विहाराचे अध्यक्ष एल. एल. गायकवाड यांनी बुद्धवंदनेसाठी याचना केली. त्यानंतर भदंत करुणानंदजी महाथेरो यांनी उपस्थित उपासक-उपासिका, बालक-बालिका आणि मान्यवरांना त्रिशरण व पंचशील प्रदान केले. बुद्ध, धम्म आणि संघाप्रती आदर व्यक्त करत उपस्थितांनी बुद्धांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्याचा आणि समाजात समता, बंधुता व मानवतेची मूल्ये रुजविण्याचा संदेश घेतला.
धम्मदेशनेतून समता, करुणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार
धम्मदेशनेत भदंत करुणानंदजी महाथेरो यांनी तथागत गौतम बुद्धांच्या शांती, समता, करुणा, मैत्री आणि बंधुतेच्या विचारांचे महत्त्व विशद केले. समाजातील दुःख, विषमता आणि भेदभाव दूर करण्यासाठी बुद्धांच्या मानवतावादी विचारांचे आचरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत बुद्धविचारांची उपयुक्तता स्पष्ट करत शिक्षण, विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतेच्या मार्गाने समाजाने प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सादर करण्यात आलेल्या ‘सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या’ या भीमगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाला सुधीर शेषवरे, अनिल जाधव, गौतम लाठे, एस. पी. हिवराळे, ॲड. नामदेव सावंत, माणिकराव जोगदंडे, विकास रामटेके, रमेश दाभाडे, शांतीलालजी दिवेकर, भगवान नरवडे, विजय गायकवाड, सुधाकर जोगदंडे, विशाल रूपेकर, राजू राऊत, ईश्वर उमाळे सर, रवी जावळे, ईश्वर लोखंडे, यशवंत जोगदंडे, विनायक साळवे, रेखाबाई साळवे, सागर नरवडे, अंकुश बोर्डे, भानुदास कीर्तीकर, अशोक कीर्तीकर, दीपक रगडे, रावसाहेब नरवडे, भीमराव भालेराव, मगनराव निकम, कचरू दळवी, भानुदास चौतमल, गौतम सरोदे, लहू परकारे, लक्ष्मण परकारे, सुरेश नरवडे, चंद्रकला साळवे, बाळू वाघमारे, भीमराज पगारे, शामराव जाधव, सिद्धार्थ भारसाखळे, अशोक जाधव, राजेश काळे, भीमरत्न कांबळे, खुशालराव बनसोडे, अशोक निकम, अंजन साळवे, गौतम बनसोडे, गयाबाई साळवे, अनुसया पंडित, सुशांत वाहुळ यांच्यासह अनेक श्रद्धावान उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनील चौतमल, लखन कुचेकर, श्रावण खरात, सुनील साळवे, जगन्नाथ निकम, मनोहर मगर, पोपट साळवे, अजय चौथमल, शिवपूजे साहेब, रवी जावळे, विजय प्रधान आणि विष्णू भावले यांनी केले. आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम, सचिव संतोष लाठे आणि वर्षावास उत्सव समितीच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
वर्षावास सांगता समारोहाच्या माध्यमातून बुद्धांच्या समता, बंधुता, करुणा आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
….
- वडगाव कोल्हाटीतील आनंद बुद्ध विहारात वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न; भदंत करुणानंदजी महाथेरो यांच्या धम्मदेशनेने श्रद्धावान मंत्रमुग्धShare Total Views: 4‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या तीन महिन्यांच्या सामूहिक वाचनाची सांगता; धम्म
- पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दत्ता वर्पे यांचे सिडको प्रशासनाला पत्र; बंद विहिरी-बोअरवेल स्वच्छ करण्याची मागणीShare Total Views: 6शासनाच्या पाणीटंचाई निवारणाच्या सूचनांदरम्यान पुढाकार; स्वच्छ पाणीपुरवठा, हातपंप दुरुस्ती आणि टँकर सुरू
- नवरात्रात भगर खाताना सावधान! बुरशीग्रस्त भगरीमुळे अन्नविषबाधेचा धोका; FDA च्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचनाShare Total Views: 50छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | (NEWS MARATHWADA) नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगर खरेदी करणाऱ्या
- छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘क्लिफ ऑल डे डायनिंग’चा अन्न परवाना निलंबित; FDA ची कडक कारवाईShare Total Views: 18NEWS MARATHWADA | SANDEEP LOKHANDE छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
- ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडShare Total Views: 72बजाज नगर, वाळूज : जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयातर्फे आयोजित विविध क्रीडा





