
वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
बजाजनगर, वाळूज एमआयडीसी येथील सिडको महानगर-१ मधील नामांकित ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कॉलेजचा गौरव वाढवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
पीसीएम गटातून आदिक पूर्वल याने ९९.४२ पर्सेंटाइल मिळवत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सिंग प्रियांशू (९८.१३), नेरकर प्रांजल (९७.८१), बोळके यश (९७.२१), सिंग हरिओम (९६.३१), सराफ नरेंद्र (९५.७६), कुलकर्णी निखिल (९३.६७), प्रदुम्न तायडे (९३.०७), चौधरी पुरब (९२.९४), गायकवाड ओम (८९.९०), डिंगरे पृथ्वीराज (८७.२६), काळे नेत्रा (८७.१७) आणि कुंभार सोहम (८२.७७) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
पीसीबी गटातून गुप्ता त्रिलोकचंद याने ९४.५४ पर्सेंटाइल मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर शिंगाडे अनुज याने ९१.०६ पर्सेंटाइल मिळवून यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


