November 21, 2024
b5a78651-89f3-4921-a476-12c5e960742f

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर ) : सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील श्री सरस्वती भुवन प्रशाला भराडी येथील शाळेमधील सन २००३-०४ चे इयत्ता १० वी बॅचचे विद्यार्थी व शिक्षण तब्बल २० वर्षानंतर एकत्र आले.

यावेळी सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दि ४ नोव्हेंबर रोजी एकत्र आलेल्या विद्यार्थी शिक्षकांच्या कार्यक्रमात शिक्षकांनी पुन्हा हातात खडू घेतला आणि या धावपळीच्या जीवनात सकाळ पासून सायंकाळ पर्यंत आपल्या नोकरी व व्यवसायात गुंतलेल्या विद्यार्थ्याला शालेय जीवनातील त्या दिवसाचा अनुभव सर्व विद्यार्थ्यांनी आला.

आज विद्यार्थ्यांन प्रमाणे शिक्षणांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना भावना व्यक्त केल्या की, विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभा केलेला तो विद्यार्थी आज शिक्षक, वकील, डॉक्टर, उद्योजक, एक अधिकारी म्हणून आपल्या समोर आला तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले दिसले. शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या.

जुन्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या

२० वर्षानंतर सर्व वर्ग मित्रांना भेटण हा खूप आनंदायी क्षण होता . पुन्हा एकदा शाळेतील दिवस अनुभवता आले. सर्व शिक्षकांना भेटता आले यामुळे जुन्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या. – सागर त्रिवेदी ( माजी विद्यार्थी)

यावेळी पाटिल एम सर लालसरे सर, साळवे एस सर, सावळे व्ही सर,सुरडकर सर, ढाकने सर, सोनवणे सर, भारती सर, डी महाजन सर, एल के जोशी सर, पांडे सर, प्राचार्य गायकवाड सर यांचासह विद्यार्थी हजर होते.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!