
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने भारत-पाकिस्तान सीमेपार शस्त्रे, दारुगोळा आणि IED तस्करी प्रकरणात शुक्रवारी चार राज्यांमध्ये मोठे सर्च ऑपरेशन राबवले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील एकूण १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून, यामध्ये वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

वाळूज MIDC परिसरात कमलापूर – वाळूज रोडवरील शिवाजी नगर भागात सकाळपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू होती. या कारवाईसाठी वाळूज MIDC पोलीस ठाणे आणि वाळूज पोलीस ठाण्याकडून कडक बंदोबस्त पुरवण्यात आला होता. परिसरात दिवसभर मोठी हालचाल पाहायला मिळाली.
NIA ने उत्तर प्रदेशातील ४, राजस्थानातील २, बिहारमधील २ आणि महाराष्ट्रातील ३ ठिकाणी छापे टाकून अनेक डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. जप्त साहित्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून, या तपासातून मोठा दहशतवादी कट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी २०२६ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाली होती. स्पेशल ऑपरेशन सेलने एका संशयिताला अटक करताना त्याच्याकडून रिमोट कंट्रोल सेटसह IED, मोबाईल फोन, विदेशी बनावटीचे .३० बोर पिस्तूल, मॅगझीन आणि २० जिवंत काडतुसे जप्त केली होती.
यानंतर BNS, UAPA, Arms Act, Explosive Substances Act आणि NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास NIA कडे वर्ग झाल्यानंतर पंजाब, दिल्ली आणि इतर भागांमध्ये IED स्फोट घडवून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी करण्याचा कट असल्याचे समोर आले.
RC-08/2026/NIA/DLI या प्रकरणात अटक आरोपींचे देशातील विविध भागांतील व्यक्तींशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहशत, जाळपोळ आणि हिंसक कारवायांचा कट रचल्याचा संशय NIA ने व्यक्त केला असून, या कटात सहभागी असलेल्या इतर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा शोध सुरू आहे.
॰॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

