
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी गोरखनाथ नामदेव कडू यांना सेवानिवृत्तीपूर्वी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ते पोलीस ठाणे MIDC वाळूज येथे कार्यरत होते.
गोरखनाथ कडू हे दिनांक 19 मार्च 1993 रोजी पोलीस शिपाई म्हणून पोलीस दलात भरती झाले होते. तब्बल 33 वर्षांहून अधिक सेवाकाळात त्यांनी जिन्सी, नियंत्रण कक्ष, उस्मानपुरा, सातारा, क्रांतीचौक तसेच MIDC वाळूज पोलीस ठाण्यात उत्कृष्ट सेवा बजावली. मागील पाच वर्षांपासून ते MIDC वाळूज पोलीस ठाण्यात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
सन 2013 मध्ये त्यांनी विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांच्या सेवाकाळाची समाप्ती 31 मे 2026 रोजी होत असताना, मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीनंतर त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली आहे.
गोरखनाथ कडू यांना पदोन्नती मिळाल्यानंतर MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, तात्कालीन पोलीस निरीक्षक व आयर्नमॅन संदीप गुरमे तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा अंमलदार बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे आदींनी गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ही पदोन्नती त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तबद्ध सेवेला मिळालेली पोचपावती मानली जात आहे.
॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

