
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज : वाळूज परिसरातील बकवालनगर येथे किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलांसह पुरुष जखमी झाले असून संपूर्ण प्रकार परिसरातील कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
माहितीनुसार, बकवालनगर येथे वनारसे आणि पांढरे कुटुंब शेजारी राहतात. घराकडे सतत पाहण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वीही वाद झाले होते. दरम्यान, सोमवारी (दि. २६ मे) सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास पुन्हा दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद काही वेळातच वाढत जाऊन दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांना भिडले आणि परिसरात मोठा गोंधळ उडाला.
या मारहाणीत महिलांसह काही पुरुष जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंनी वाळूज पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

