
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-
छत्रपती संभाजीनगर (वाळूज) : येथील नामांकित शिक्षण संस्था ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत असलेल्या ऑर्किड टेक्नो स्कूलची विद्यार्थिनी कु. अनुष्का बुद्धेवार हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत तिची इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे.
अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत अनुष्काने आपल्या मेहनतीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर घवघवीत यश मिळवले. तिच्या या यशामुळे ऑर्किड टेक्नो स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शाळेमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी दिले जाणारे विशेष मार्गदर्शन, शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे हे यश शक्य झाल्याचे अनुष्काने सांगितले.
अनुष्का बुद्धेवार हिच्या या यशाबद्दल ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी तिचे अभिनंदन केले आहे. परिसरातूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
॰॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

