
न्युज मराठवाडा वृत्तसेवा (Sandeep Lokhande ) –
छत्रपती संभाजीनगर : एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाणे हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा कापून तसेच दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे डॉक्टरांच्या अहवालातून स्पष्ट झाले असून या प्रकरणी 24 मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 मे 2026 रोजी जोगेश्वरी लावकी वस्ती कडे जाणारा रस्ता विटावा शिवार ते लांजी रोडवरील अंदाजे 40 वर्षीय अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. डायल पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीस उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.
सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांच्या अहवालानंतर संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती तसेच आरोपी दोघेही अद्याप अज्ञात असून नेमका खून कुणी केला आणि मृत व्यक्ती कोण आहे, याचा तपास एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस करत आहेत.
मृत इसमाचे वर्णन मध्यम बांधा, वय अंदाजे 40 ते 45 वर्ष, उंची सुमारे 5 फूट 3 इंच, सावळा रंग असे असून अंगात काळा-पांढरा चेक्सचा शर्ट व पांढऱ्या रंगाचे बूट होते. तसेच पायावर चंद्राचे चिन्ह गोंदलेले असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
•••••••
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

