
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे
Chhatrapati Sambhajinagar : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या “कॉकरोच जनता पार्टी” या सोशल मीडिया आंदोलनामागील तरुण चेहरा अभिजीत दिपके सध्या प्रचंड चर्चेत आहे. बेरोजगार तरुणांबाबत करण्यात आलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या अभिजीतने सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” नावाने इंस्टाग्राम हँडल सुरू केले आणि काही दिवसांतच त्याला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळू लागला. लाखो बेरोजगार युवकांनी या मोहिमेला पाठिंबा दिल्याने हे प्रकरण राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहे.

अभिजीत दिपके सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असून त्यांचे आई-वडील वाळूज महानगर परिसरात वास्तव्यास आहेत. मुलाच्या सोशल मीडिया लोकप्रियतेमुळे आणि वाढत्या राजकीय चर्चेमुळे त्यांच्या कुटुंबीयांची मात्र चिंता वाढली आहे. अभिजीतची आई अनिता दिपके आणि वडील भगवान दिपके यांनी न्यूज मराठवाडाशी बोलताना मुलाने राजकारणापासून दूर राहून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे, अशी भावना व्यक्त केली.
“आम्ही राजकारणात नाही. अचानक मुलाच्या नावाभोवती एवढं मोठं वातावरण तयार झालं आहे. सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे भविष्यात काही अडचणी निर्माण होऊ नयेत, अशी पालक म्हणून चिंता वाटते. त्याने आपली नोकरी आणि शिक्षण सांभाळून पुढे जावे,” असे अभिजीतच्या आई-वडिलांनी सांगितले.
दरम्यान, अभिजीतला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्याचेही त्यांच्या आईने सांगितले. कोरोना काळात त्याने घरातील राशन गरजू आणि गरीब लोकांमध्ये वाटून दिले होते. समाजातील दुर्लक्षित घटकांबद्दल त्याच्या मनात कायम संवेदनशीलता होती, असेही त्यांनी नमूद केले.
अभिजीतची बहीणही अमेरिकेत नोकरी करत असून तिने देखील आईला फोन करून चिंता व्यक्त केली. “राजकारण हे धोकादायक क्षेत्र आहे. अभिजीतने यात जास्त गुंतू नये,” अशी भावना तिने व्यक्त केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अभिजीतचे वडील भगवान दिपके हे वाळूज एमआयडीसीमध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत होते आणि सध्या सेवानिवृत्त आहेत. दिपके कुटुंबाचे मूळ गाव Hingoli जिल्ह्यात आहे. अभिजीतने प्राथमिक शिक्षण बजाजनगर येथे पूर्ण केले, तर पुढील शिक्षणासाठी तो Pune येथे गेला. त्यानंतर त्याने Arvind Kejriwal यांच्या सोशल मीडिया टीमसोबतही काम केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत आहे.
दरम्यान, “कॉकरोच जनता पार्टी” या नावाभोवती निर्माण झालेल्या चर्चेमुळे बेरोजगार तरुणांचा मोठा वर्ग व्यवस्थेविरोधातील नाराजी व्यक्त करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोशल मीडियावर अभिजीत दिपकेला मिळणारा प्रतिसाद हा केवळ एका व्यक्तीचा पाठिंबा नसून बेरोजगारी, असंतोष आणि युवकांच्या भावना यांचे प्रतीक बनत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
….
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
