May 20, 2026
fc294980-a408-4dea-8689-6a7222fdb991

बजाजनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी – २०२६ चा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला असून, बजाजनगर येथील Orchid Group of Institutions च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेत इयत्ता ५ वी मधील तब्बल ७२ विद्यार्थी उत्कृष्ट गुणांसह पात्र ठरले आहेत. तसेच इयत्ता ८ वी मधील ३९ विद्यार्थ्यांनीही उत्तम यश मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गुणपडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष Srinivas Nandamuri, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!