
छत्रपती संभाजीनगर : साहित्य भारतीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय सांभाळकर यांची जिल्हा मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती साहित्य भारतीचे प्रांत अध्यक्ष प्रा. डॉ. सर्जेराव जिगे तसेच प्रांत कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री. उमेश काळे यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रा. डॉ. संजय सांभाळकर यांनी यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी कल्याण संचालक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून त्यांनी ५० पेक्षा अधिक संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. तसेच ५ ग्रंथांचे लेखनही त्यांनी केलेले आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
…..
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

