Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : विवाहाचे आमिष दाखवून इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, विशेष म्हणजे अत्याचार करणारा आरोपी देखील १७ वर्षांचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पीडिता आणि आरोपी हे दोघेही वडगाव (को.) येथील गट नंबर परिसरातील रहिवासी आहेत. मंगळवारी पीडित मुलीला घरात उलट्या होऊ लागल्याने तिच्या आईने तिला बजाजनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.

शाळेतील ओळखीचे रूपांतर प्रेमात:
हा प्रकार समजताच पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. शाळेत शिकत असताना ३ वर्षांपूर्वी तिची या मुलाशी ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री होती, मात्र पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. ९ एप्रिल रोजी आरोपीने तिला आपल्या घरी बोलावले होते. तिथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला, ज्यातून ती गर्भवती राहिली.
पोलीस कारवाई:
याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
॰॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



