
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
पंढरपूर : गावामध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या वतीने नागरिकांना दिलासा देण्यासाठी दररोज तीन पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या टँकर सेवांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या विद्या रमेश गायकवाड, पंचायत समिती सदस्या लताबाई, कानडे, माजी सरपंच अख्तर शेख, मेहबूब चौधरी, के. व्ही. गायकवाड, महिंद्रा खोतकर, रोहित राऊत, ग्रामपंचायत सदस्य आमेर पठाण, संतोष चोरडिया, ग्रामसेवक हरीश आंधळे, करू सुकधन, दिपक कानडे, मुजाहिद शेख, रुबीना शेख, डॅनी जगताब, अविनाश घुले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन पंचायत समितीने तातडीने तीन टँकरची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा दिला आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
……..
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



