
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री केलेल्या ‘अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले’ या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी, “मी जय भीमच्या घोषणा देतो, आंबेडकरांचे विचार मांडतो, मग ते अराजक कसे ठरू शकते?” असा सवाल उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा विचार करावा, असे सांगत दिपके म्हणाले, “ते उत्तर प्रदेशचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विचारांना मानणारा राज्य आहे. जे आंबेडकरांचे पुस्तक हातात घेऊन चालतात आणि जय भीमच्या घोषणा देतात, त्यांना अराजकतावादी म्हणणे दुर्दैवी आहे.”
यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवरही सरकारवर टीका केली. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील तरुण आता सरकारला घाबरत नसल्याचा दावा करत दिपके यांनी युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
