
वाळूज महानगर : इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यामध्ये श्रेयस संदीप साबळे याने ८५ टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले. तसेच सम्यक दत्ता तरकासे याने ६८ टक्के, तर सागर रघुनाथ मरकड याने ५५ टक्के गुण मिळवले. हे तिन्ही विद्यार्थी त्रिमूर्ती कॉलनी, रांजणगाव शेणपूंजी, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाजसेविका शालिनी वाकोडे आणि योगेश साबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिक्षक, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
॰॰॰॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



