
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत असलेल्या ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी SSC 2025-26 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत यशाचे शिखर गाठले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखत विशेष प्राविण्यासह मोठे यश मिळवले.
यंदाच्या निकालात तब्बल 102 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, 68 विद्यार्थ्यांनी 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळाच्या जोरावर हे यश संपादन केले.
या परीक्षेत तन्मय हरी थोरात याने 99 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे संस्कृत विषयात त्याने 100 पैकी 100 गुण मिळवले. वेदांत संजय सूर्यवंशी याने 98.2 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर राजेश्वरी कल्याण मुचक हिने 95.8 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच रोहित लहू महाजन – 95.4%, सुरंजन दिपक मोहिते – 95%, मानसी मारुती चव्हाण – 94.2%, दुर्गेश चंद्रशेखर शेवाळे – 93.4%, वेद महेश काटेकर – 93.4%, अपूर्वा संजय नंदवे – 93%, तन्मय संजय गायकवाड – 92.4%, मानसी नितीन राणे – 92.4%, भक्ती शिवशंकर धनगर – 92%, मोहम्मद अख्तर खादर शेख – 91.6%, आदिती दिनेश लांबे – 91.4%, आशुतोष प्रमोद साखरे – 91.4%, गौरव संजय ठोंबरे – 91.4%, रुतुजा रविंद्र बडगे – 91.2%, ओम मनेश भवर – 90.6%, सिद्धेश विलास मुद्देराज – 90.6%, आयुष्का समाधान भोसले – 90.4% आणि सर्वज्ञ नंदकिशोर गव्हाणकर – 90.4% गुण मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
•••••••••••••••••
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



