
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील तिसगाव शिवारात ३० एप्रिल रोजी मोकळ्या जागेत मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सांगाड्यावस्थेत मृतदेह सापडल्यामुळे सुरुवातीला मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेहावरील कपडे, हातातील कडे तसेच इतर ओळख पटवणाऱ्या बाबींचे वर्णन सांगितले. त्यावेळी हा सांगाडा रोहन बाळासाहेब हांडीबाग (वय ३९, रा. बजाजनगर) यांचा असल्याची शक्यता समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन हांडीबाग हे १० एप्रिल रोजी अंबाजोगाई येथून खाजगी बसने बजाजनगरकडे येत होते. पहाटे पंढरपूर येथील ओयसिस चौक परिसरात ते बसमधून उतरल्याचे आणि त्यानंतर पायी जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. मात्र त्यानंतर ते घरी न परतल्याने त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात मृतदेहाजवळील कपडे, हातातील कडे आणि शरीरावरील जन्मखुणांच्या आधारे नातेवाईकांनी प्राथमिक ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी डीएनए तपासणी प्रक्रिया पूर्ण केली असून ७ मे रोजी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच मुकुंदवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, रोहन हांडीबाग यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ही हत्या आहे, आत्महत्या आहे की अन्य काही कारण, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस विविध अंगांनी तपास करत असून या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 7 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 13 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


