
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात तब्बल २९ जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या बेपत्ता व्यक्तींमध्ये १३ महिला व मुलींचा समावेश असून सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बेपत्ता नोंद आकडेवारीनुसार, १६ पुरुष आणि १३ महिला-मुली बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. जोगेश्वरी, रांजणगाव, वडगाव कोल्हाटी, सिडको महानगर, बजाजनगर, पंढरपूर आदी भागांतील नागरिक या यादीत आहेत. डुप्लिकेट नावे वगळल्यानंतर ही अंतिम यादी समोर आली आहे.
⸻
एप्रिल २०२६ – बेपत्ता नागरिकांची यादी
तुषार संजय नरवडे (२१) – जोगेश्वरी ता. गंगापूर, सिराजुद्दीन राजू खान (२४) – सलामपुरे पंढरपूर, संजना दत्ता जाधव (२२) – जोगेश्वरी, अजय प्रेम सिंग (५०) – फुलेनगर पंढरपूर, सुमित्रा गणेश घाईट (२५) – वडगाव कोल्हाटी, पूजा सुरेश थोरात (१९) – सिडको महानगर-१, अन्सार रशीद शहा (५४) – साजापूर ता. जि. छत्रपती संभाजीनगर, कृष्णा निवृत्ती बरसाले (३८) – जोगेश्वरी ता. गंगापूर, सरला संदीप ताजे (२९) – राजणगाव, सुजाता निरंजन मुदली (३०) – रांजणगाव, आरती कारभारी खैरे (२९) – रांजणगाव, मनीषा दीपक कुचेकर (३५) – वडगाव, कोमल मनोज जाधव (२०) – पवननगर रांजणगाव, श्रुती सदाशिव खरात (२०) – जोगेश्वरी, अनिल नाना खिल्लारे (२६) – वडगाव फाटा, वैभव नारायण भोसले (२५) – पवननगर रांजणगाव, मेहराज युसुफ शेख (३०) – जोगेश्वरी, गोकर्णा गणेश गरड (३०) – रांजणगाव, सरिता ओमप्रकाश मिश्रा (४२) – पवननगर रांजणगाव, वैभव गंगाधर बिरदे (२२) – विटावा, रामशंकर ताबीलसिंग गौंड (२४) – साजापूर, गायत्री नानेश्वर वानखेडे (२०) – रांजणगाव, कोमल राजेश पांढरे (१८) – जयभवानी चौक, जीवनकुमार अंबादास मुंतोडे (४८) – वडगाव कोल्हाटी, तेजस बाबुराव भुमकर (३०) – सिडको महानगर, राहुल राजाराम मोरे (३२) – बजाजनगर, प्रकाश इरवंता लघुळे (२६) – फुलेनगर पंढरपूर, राहुल सिताराम बनकर (२८) – घाणेगाव, रोहन बाळासाहेब हंडीबाग (३९) – ओयसिस चौक
⸻
दरम्यान, कुटुंबीयांकडून संबंधितांचा शोध सुरू असला तरी अनेकांचा अद्यापही मागमूस लागलेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेपत्ता प्रकरणे समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व प्रकरणांचा सखोल तपास करून बेपत्ता नागरिकांचा शोध लावण्याची मागणी जोर धरत आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


