
वाळूज : घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना वाळूजजवळील बकवाल नगर येथे बुधवारी (६ मे) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बकवाल नगर येथील रहिवासी भगवान काकडे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून विवाहित योगिता गणेश सावंत (वय ३४) यांनी खाली उडी घेतली. रागाच्या भरात त्यांनी ही उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.
सिद्धेश्वर गिरी व भगवान काकडे यांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांनी प्राण सोडले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
….
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 7 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 13 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


