
छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजक आणि पोलीस प्रशासन यांच्यात सुसंवाद वाढवण्यासाठी मसिआ (MASSIA) तर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक मंगळवार, दि. ५ मे रोजी दुपारी ४ वाजता वाळूज एमआयडीसीतील मसिआ कार्यालयात, ‘अनिल विश्वासराव चव्हाण सभागृहात’ होणार आहे. बैठकीस पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीत वाळूज परिसरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांचा आढावा घेतला जाणार असून, औद्योगिक सुरक्षेसंदर्भात उपाययोजना, कायदेशीर जबाबदाऱ्या आणि पोलीस–उद्योजक समन्वय यावर सविस्तर चर्चा होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मसिआतर्फे सर्व उद्योगसंस्थांचे मालक, संचालक आणि मुख्य व्यवस्थापक यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
…..
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


