Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरातील बजाजनगर परिसरात अवैधरीत्या लावण्यात आलेल्या बॅनरमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य रस्त्यांवर व चौकांमध्ये लावलेले बॅनर वाऱ्यामुळे आडवे होऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करत आहेत. काही बॅनर खाली पडत असून, काही फाटून रस्त्यावर येत असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
मोरे चौकासह अनेक ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हे बॅनर दिसणे कठीण होत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते. स्थानिकांच्या मते, यामुळे आधीही काही अपघात घडले असून जीवितहानीही झाल्याची चर्चा आहे.

राजकीय कार्यक्रम, वाढदिवस आणि विविध जाहिरातींसाठी हे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले जातात. मात्र, त्यांची योग्य देखभाल किंवा नियमन न केल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. काही वेळा या बॅनरवर महापुरुषांचे फोटो असतात. बॅनर खाली पडल्यामुळे त्या प्रतिमांचा अवमान होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित प्रशासन आणि वाळूज एमआयडीसी वाहतूक विभागाकडून केवळ तात्पुरती कारवाई केली जाते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, अवैध बॅनर तात्काळ हटवून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


