
छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील गट क्रमांक 108 मध्ये एका मोकळ्या जागेत पुरुषाचा मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित सांगाडा साधारण एक महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माहितीनुसार, हा सांगाडा एका मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी अर्धवट पॅन्टही सापडली असून काही अवशेष इतरत्र पसरलेले होते. त्यामुळे हा प्रकार घातपात, आत्महत्या किंवा अन्य काही आहे का, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.
दरम्यान, परिसरातील कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या संदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


