
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या घटना एकाच परिसरात वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी होत आहे.
दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजता जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या पती-पत्नीवर शिवाजी महाराज चौक, सिडको वाळूज महानगर येथे ही घटना घडली. समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराने अचानक महिलेच्या गळ्यातील 5 ग्राम 25 मणी असलेले सुमारे 66,400 रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. कामिनी प्रदीप गहिवडे (वय 40, रा. देवगिरी नगर, सिडको वाळूज महानगर) असे पीडित महिलेचे नाव आहे.

घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. या प्रकरणी 24 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे करत आहेत.
दरम्यान, गेल्या एका महिन्यात अशा प्रकारच्या जवळपास पाच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी नियमित गस्त ठेवावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


