
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या जलद प्रतिसादामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. पती-पत्नीतील वादातून एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती डायल ११२ वर मिळताच पोलिसांनी केवळ ४ मिनिटे ३० सेकंदांत घटनास्थळी पोहोचत संबंधित व्यक्तीचे प्राण वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, एस.एस. क्लब परिसरातून संबंधित व्यक्तीच्या मामाने पोलिसांना कॉल करून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असून पती आत्महत्येचा प्रयत्न करत आहे व कुणाच्याही सांगण्याकडे लक्ष देत नसल्याची माहिती दिली. या कॉलची दखल घेत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पथकाने कोणताही वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी संयमाने आणि समजूतदारपणे संबंधित व्यक्तीशी संवाद साधत त्याचे मनपरिवर्तन केले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून संबंधित व्यक्ती सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
या कार्यात पोलीस अमलदार जयेश साळुंके, सुहास मुंढे आणि सचिन ठोकळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीबद्दल नातेवाईकांसह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ही घटना आज दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे एक जीव वाचल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
….
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


