
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या 2025-26 च्या निकालात ऑर्किड टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या या निकालात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या परीक्षेत खोबरे हर्षल कैलास याने 97.2% गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. अजमेरा नैतिक सुदेशकुमार याने 97% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले असून त्याने संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले. वाकडीकर अमेय अनिल यानेही 97% गुण मिळवत संस्कृत आणि सामाजिक शास्त्र या दोन्ही विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
शाळेतील एकूण सात विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. यंदा एकूण 117 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त, तर 24 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवत शाळेच्या निकालात भर घातली.
या ऐतिहासिक यशाबद्दल शाळेचे संचालक श्री. श्रीनिवास नंदमुरी आणि प्राचार्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


