
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात सत्यजीत गॅस एजन्सीकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गॅस सिलेंडर बुकिंग करूनही १५ ते २० दिवस उलटून जात असताना घरपोच सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्याऐवजी सिडकोमधील मोकळ्या जागांवर बोलावून रस्त्यावरच वितरण केले जात आहे. या प्रकारामुळे विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, काही ठिकाणी जीवितासही धोका निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाळूज महानगरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास असल्याने अनेक कुटुंबांमध्ये पुरुष दिवसभर कामावर गेलेले असतात. अशा परिस्थितीत महिलांना लहान मुलांना सांभाळत सिलेंडर आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. काही महिलांना तर पर्याय नसल्याने भरलेले सिलेंडर डोक्यावर घेऊन नेण्याची वेळ येत असल्याचेही समोर आले आहे.
विशेष म्हणजे, घरपोच वितरणाच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेतले जातात. मात्र प्रत्यक्षात घरपोच सेवा दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार वेगवेगळ्या वेळा सांगून ग्राहकांना फिरवले जात असल्याने मानसिक त्रासही वाढत आहे.
दरम्यान, सत्यजित इंडेन गॅस एजन्सी व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, वितरण करणारा कर्मचारी नवीन असून परिसरातील पत्ते नीट माहिती नसल्यामुळे ग्राहकांना एका ठिकाणी बोलावून गॅस दिला जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले की, ग्राहकांना घरपोच गॅस वितरण करणे ही संबंधित एजन्सीची जबाबदारी आहे. रस्त्यावर सिलेंडर वितरण होत असल्यास संबंधित एजन्सीला तात्काळ सूचना देऊन घरपोच सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले जातील.
या संपूर्ण प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः महिला वर्गातून संबंधित एजन्सीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


