Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
छत्रपती संभाजीनगर (वाळूज महानगर) : बजाजनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, ३२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल ३० वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण (नाव बदललेले – मितेश) हा आपल्या पत्नी आणि मुलासह बजाजनगरमधील एका सोसायटीत मागील सुमारे १० वर्षांपासून राहत आहे. तो मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असून वाळूज परिसरात कामगार म्हणून काम करतो. सध्या त्याची पत्नी दुसऱ्या प्रसूतीसाठी माहेरी गेल्याने तो घरी एकटाच होता.

दि. १५ एप्रिल रोजी रात्री मितेशने मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा त्याने घरातील चाकूने स्वतःच्या हातावर वारंवार वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर बाब म्हणजे, तो रात्रभर रक्ताच्या थारोळ्यातच घरात पडून होता.
दि. १६ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्याला शुद्ध आली. तहान लागल्याने त्याने शेजाऱ्यांकडे पाणी मागितले. त्यावेळी शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता घरात सर्वत्र रक्त साचलेले दिसून आले. हा प्रकार पाहून नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर नागरिकांनी त्याला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले, जिथे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. पुढे त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मितेशने इतका टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, मात्र तो काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. हा प्रकार घरगुती वादातून घडला की इतर कोणत्या कारणामुळे, याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
….
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


