
छत्रपती संभाजीनगर (गंगापूर तालुका) : रांजणगाव येथील साई हॉटेल समोर किरकोळ वादातून रिक्षाचालकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 15 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत उत्तम भागोजी लोहकरे (वय 50) हे जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहकरे यांचा मुलगा उमेश लोहकरे हा रिक्षा घेऊन उभा असताना आरोपी सोनू सिरसाट (रा. हरिओम नगर) व त्याच्या सोबत असलेल्या दोन जणांनी विनाकारण वाद घालत मारहाण केली. यावेळी उमेशने वडिलांना फोन करून माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या उत्तम लोहकरे यांनी वादाचे कारण विचारले असता आरोपींपैकी एका अनोळखी इसमाने त्यांच्या डोक्यावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच “तू रोज रस्त्यावर असतोस, उद्या तुला बघून घेऊ” अशी धमकीही दिली. यावेळी लोहकरे यांचे मित्र रामदास नानवटे हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही लाकडी फळीने मारहाण करण्यात आली.
जखमी अवस्थेत लोहकरे यांना तातडीने पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
या प्रकरणी आरोपी सोनू सिरसाट व इतर दोघांविरुद्ध मारहाण, चाकू हल्ला व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
……..
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


