
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : मेटलमन ऑटो लिमिटेडसाठी अभिमानास्पद ठरणारी घटना घडली असून, कंपनीला ‘नारायण मेघाजी लोखंडे व्यवसाय सुरक्षा आणि आरोग्य पुरस्कार – २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला.

कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर येथील बी-१२ प्लँटने ‘धोकादायक कारखाने’ या गटात उत्कृष्ट सुरक्षा व आरोग्य व्यवस्थापनासाठी द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले. कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.
राज्याचे कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने एजीएम-एचआर श्री. विजय साळवे व त्यांच्या सुरक्षा पथकाने हा सन्मान स्वीकारला.

“सुरक्षा प्रथम ही आमची कार्यसंस्कृती असून, सातत्यपूर्ण सुधारणा आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीमुळे हे यश शक्य झाले,” असे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.
या यशात गजानन वटणदार, सचिन तायडे, निकिता व गुरुदास पराते यांचे विशेष योगदान लाभले असून, संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे. भविष्यातही सुरक्षित कार्यस्थळासाठी नवे मानदंड प्रस्थापित करण्याचा निर्धार कंपनीने व्यक्त केला आहे.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

