
वाळूज एमआयडीसी परिसरातील ओएसिस चौक येथून 34 वर्षीय रोहन हंडीबाग हे 10 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 7 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
रोहन हंडीबाग यांची उंची अंदाजे 5.4 फूट असून बांधा सडपातळ आहे. त्यांचा वर्ण सावळा असून काळे केस, काळे डोळे व डोळ्यावर चष्मा आहे. हरवताना त्यांनी फिकट गुलाबी शर्ट, फिकट चॉकलेटी पॅन्ट परिधान केली होती आणि त्यांच्या सोबत काळी-पांढरी गोल कपड्यांची छोटी बॅग होती. ते मराठी व हिंदी भाषा बोलतात.
या प्रकरणाची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदर व्यक्तीचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय व स्थानिक नागरिकांकडून प्रयत्न सुरू असून, कोणीही संबंधित माहिती आढळल्यास त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्क क्रमांक:
• 9503726267
• 7720081507
• 7066174665
• 8329996841
📍 पत्ता:
घर नं. 204, सी-5 बिल्डिंग, दिशा कुंजबन सोसायटी, वडगाव कोल्हाटी, भोंडवे पाटील शाळेजवळ, वाळूज एमआयडीसी.
👉 नागरिकांनी कोणतीही माहिती लपवू नये व तात्काळ कळवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
•••••••
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

