
वाळूज महानगर : वडगाव गट नंबर परिसरातील ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे संचालक उमेश दुधाट पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी विद्यार्थ्यांसमोर डॉ. आंबेडकर यांचे महान कार्य, त्याग आणि समाजासाठी दिलेले योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या विचारांप्रती आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडमिन गीतांजली राऊत तसेच शिक्षिका शीतल शेंडे, रेखा अंकामवर व शीतल तुपे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व सकारात्मक विचारांची रुजवात होत असल्याचे दिसून आले.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

