
छत्रपती संभाजीनगर (दि. ११ एप्रिल २०२६) : करमाड येथील पेट्रोल पंपावर घडलेल्या तरुणीच्या खून प्रकरणात पोलिसांनी पुढाकार घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिल्यामुळे ही वेळ पोलिसांवर आली. अखेर दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
या प्रकरणातील आरोपी सत्यम गवांडे याला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीकडून खूनासाठी वापरलेला चाकू आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गवांडे हिचा विवाह ५ नोव्हेंबर २०१९ रोजी झाला होता. मात्र, आरोपी सत्यम पत्नीवर सतत संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. या पार्श्वभूमीवर त्याने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी करारनामा करून दिला होता.
याच वादातून संतप्त झालेल्या सत्यमने बुधवारी दुपारी पूजावर चाकूने हल्ला करत तिचा निर्घृण खून केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चव्हाण, अंमलदार विजय जाधव आणि रामेश्वर खंडाळे करत आहेत.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

