
वाळूज महानगर : दि. ७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांच्या वतीने वडगाव (कोल्हाटी) येथे शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक नरेश ठाकरे, ग्रामविकास अधिकारी भीमराव भालेराव तसेच महावितरण, एमआयडीसी व अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नागरिकांनी रस्ते मोकळे ठेवणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, कचरा साफसफाई, वाहतूक वळविणे तसेच अवैध देशी दारू विक्री बंद ठेवण्याबाबत मागण्या केल्या. काही नागरिकांनी मिरवणुकीत डीजे लावण्यास परवानगी देण्याची मागणीही मांडली.
महावितरण विभागाने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले, तर ग्रामपंचायतीकडून स्वच्छता व फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एमआयडीसीकडून कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले की, मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविणे, वाहतूक कोंडी टाळणे व अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नवीन मिरवणुकांना परवानगी दिली जाणार नाही. डीजे वापरल्यास कारवाई होणार असून सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन केले जाईल. तसेच शार्पी व लेसर लाईट्सवर बंदी राहणार आहे.
पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी स्पष्ट केले की, मिरवणुकीत डीजेला परवानगी दिली जाणार नाही. नियमभंग केल्यास कडक कारवाई केली जाईल. रस्ते ब्लॉक होऊ दिले जाणार नाहीत, अवैध पुतळे बसविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल तसेच अतिक्रमण हटविण्यावर भर दिला जाईल. “एक मंडळ – एक पोलीस कर्मचारी” ही संकल्पना राबविण्यात येणार असून मोठ्या मार्गांची पाहणी केली जाणार आहे. तिसगाव येथे भेट देण्यात येणार असून राजनगर भागात महिला पोलीसांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज व्हॅन गस्त घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंती उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

