
छत्रपती संभाजीनगर (दि. ६ एप्रिल) : MIDC वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपी योगेश नंदु सांगळे (वय ३०, रा. बजाजनगर) याच्यावर MPDA कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी आदेश देत त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
योगेश सांगळे याच्यावर MIDC वाळुज तसेच हर्सुल पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात मारहाण, धमकी, शस्त्र बाळगणे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अशा विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले गेले आहेत.
पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपी हा वारंवार गुन्हे करणारा असून तो परिसरात राहत असल्यास पुन्हा गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी ५ एप्रिल रोजी MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून इतरही रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छाननी सुरू असून, आणखी काही आरोपींवर MPDA अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

