
छत्रपती संभाजीनगर (वाळूज) : बजाज नगर, वाळूज येथील ऑर्किड टेक्नो स्कूल व ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा यंग सायंटिस्ट अवॉर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेची परंपरा कायम राखली आहे. दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथील यशवंत नाट्य मंदिर येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा मेडल व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या परीक्षेत इयत्ता ९ वीतील सर्वेश कदम, सोनिका सिंघमपल्ली व सोहम थोरात यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सिल्वर मेडल मिळवले. तसेच इयत्ता ६ वीतील देवश्री कोतकर व इयत्ता ९ वीतील समर्थ मोगरे यांनी ब्राँझ मेडल प्राप्त केले. या पाचही विद्यार्थ्यांनी परीक्षेतील लेखी, प्रात्यक्षिक, रिसर्च व तोंडी असे सर्व चारही राऊंड यशस्वीपणे पूर्ण केले.
डॉ. होमी भाभा परीक्षेतील कठीण चारही टप्प्यांमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रदर्शन करत एकूण ३ सिल्वर व २ ब्राँझ मेडल मिळवले. यापूर्वीही ऑर्किड टेक्नो स्कूल व ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत विविध टप्प्यांपर्यंत यश मिळवले आहे.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

