
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अखेर पदाधिकाऱ्यांच्या निवडीला सुरुवात झाली असून अर्थ व बांधकाम सभापतीपदी सचिन गरड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना बळ मिळाले आहे.
निवड प्रक्रियेदरम्यान संबंधित सदस्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये बहुमताच्या जोरावर सचिन गरड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सभापती म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गरड यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, बांधकाम आणि अर्थसंकल्पीय नियोजनावर विशेष भर देणार असल्याचे संकेत दिले. तसेच सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून विविध विकासकामांना चालना मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

