
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी सर्रास वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्यास असल्याने गॅसची मागणी वाढलेली असताना, सध्याच्या तुटवड्याच्या परिस्थितीत सामान्य नागरिकांना सिलेंडरसाठी तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत.
मात्र, व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याच्या कारणावरून अनेक छोटे व्यावसायिक खुलेआम घरगुती सिलेंडरचा वापर आपल्या व्यवसायासाठी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळणे कठीण झाले असून संतापाची लाट उसळली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यावसायिक जास्तीचे पैसे देऊन घरगुती सिलेंडर सहज मिळवतात, तर दुसरीकडे सर्वसामान्य लोक बुकिंग करूनही दिवसभर रांगेत उभे राहूनही सिलेंडरपासून वंचित राहतात. या प्रकाराला संबंधित एजन्सींचेही अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
अलीकडेच बजाज नगर येथील कोलगेट चौकात बीएसएनएल गोदामासमोर एका पंक्चर दुकानात भर रस्त्यावर घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता विटावा फाटा येथे चहाच्या टपरीसाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
या सततच्या घटनांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधित व्यावसायिक आणि एजन्सींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
“सामान्य नागरिकांना सिलेंडर मिळत नाही आणि काहीजण खुलेआम गैरवापर करत आहेत; प्रशासनाने तातडीने कारवाई करावी,” अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
••••
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन
Share Total Views: 18 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला
Share Total Views: 1,080 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न
Share Total Views: 27 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन



